सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमठाणा येथे दिवसा दुपारच्या वेळी बिअरबार समोर चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली म्हणून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड घाटनांद्रा रस्त्यावरील आमठाणा गावाजवळ असलेल्या आमदार बियर बार समोर शुक्रवार रोजी दुपारी
तालुक्यातील तळणी येथील ट्रक चालक असलेला युवक प्रमोद तात्याराव ठोंबरे (२३) याने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, आरोपी अजय माणिक हाके (रा. सिरसाळा ता. सिल्लोड) यास फिर्यादी याने लग्न केलेल्या मुलीसोबत लग्न आज तुझा गेमच करतो, तुला मारून टाकल्यावरच माझे तिच्या सोबत लग्न होईल असे म्हणुन फिर्यादिच्या पाठीत हॉकी स्टिक व शॉकअप रॉडने पाठीत मारहान त्याच्या करायचे होते.
परंतु फिर्यादीने तिच्या सोबत लग्न केल्याचा राग मनात धरून आरोपी अजय व त्याच्या इतर तीन साथीदारांनी फिर्यादी यास शिवीगाळ करुन हातातील हॉकी स्टिक फिर्यादिच्या समोरच्या बाजूने डोक्यात मारली. उजव्या पायावर पोटरीच्या हाडावर मारुन फिर्यादीस गंभीर दुखापत केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अजय हाके व इतर तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवार (दि.१८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे हे करीत आहेत.













